Friday, June 20, 2008

पु. ल. देशपांडे as a poet.

मी राहतो पुण्यात
म्हणजे विद्वत्तेच्या 'ठाण्या'त।
इथल्या मंडईचेदेखील विद्यापीठ आहे।
आणि विद्यापीठाची मंडई झाली आहे।
बोलणे हा इथला धर्म आहे
आणि ऐकणे हा दानधर्म आहे।
म्हणून वक्ते उपदेश करतात
आणि श्रोते उपकार करतात
उपचारांना मात्र जागा नाही।
********************************
अहो ज्ञानियांच्या राजा । कशाला फुकाच्या गमजा?
एकेकाळी रचिली ओवी । व्हाल का हो नवकवी?
मारे बोलविला रेडा । रेघ बी. ए. ची ओलांडा!
तुम्ही लिहावी विराणी । लिहा पाहू फिल्मी गाणी
म्हणे आळंदी गावात । तुम्ही चालवली भिंत
चालवून दाखवा झणी । एक नाटक कंपनी
बाप रखुमादेवीवरा । आमुचा च्यालेंज स्वीकारा
********************************
पंचवीस मार्क कमी पडून
नापास झालेले चिरंजीव
तीर्थरुपांना म्हणाले,
'मी पहिल्यापासूनच
मार्क्सविरोधी गटात आहे.
***************************
माझ्या खोलीतल्या फोटोतली तरुणी
परवा मला म्हणाली,
'मला चांगलेसे स्थळ शोधून द्या ना-
इथे माझा जीव टांगल्यासारखं वाटतंय'
*****************************
बहात्तर कादंबऱ्या लिहिणारी
माझी थोर साहित्यिक आत्या
दम्याने पंचाहत्तराव्या वर्षी वारली
तेव्हा 'सुटली' म्हणायच्या ऐवजी
तुम्ही 'सुटलो' म्हणालात...
***************************
लेखक : पु. ल. देशपांडे

1 comment:

अमित said...

Namaskar,

Tumacha ha upakram nakkich stutya aahe. Parantu aapan jar ithe itaranchya kavita takanaar asal tar krupaya hya blog var jaahirati taku naka. Kavitanchya malakanchi paravanagi na gheta tyanchya kavitancha vaapar artha prapti saathi kela tar copyright cha bhanga hoto. Aani ekhadya kavi ne aakshep ghetala tar vaadaache prasanga pan yeu shakatat.

All the best for your new blog. Keep up the good work. :)